Thursday 6 December 2018

केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी


केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी


       नाशिक दि.6 :चार सदस्यीय केंद्रीय पथकाने मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबा) आणि मेहुणे गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
 पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी.देशपांडे, सहसचिव छावी झा, डिपार्टमेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए.के.तिवारी, एमएनसीएफसीच्या सहाय्यक संचालक डॉ.शालिनी सक्सेना यांचा समावेश आहे.

          पथकाने प्रथम मेहुणे येथे शोभाबाई देवरे यांच्या शेतातील नुकसान झालेल्या ज्वारी आणि भुईमुग पिकाची पाहणी केली. वऱ्हाणे शिवारातल बाजीराव पवार यांनी डाळींबाच्या बागेचे पावसाअभावी नुकसान झाल्याची माहिती दिली.

          पथकाने गावातील विहीरीच्या पाणी पातळीची माहिती घेतली. विहीरीत दोनदा टँकरने पाणी आणून पाणी पुरवठा होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यानंतर पथकाने जळगाव (निंबा) येथील दिनकर दुकळे यांच्या शेततळ्याची पाहणी केली. भिका भालनोर यांनी बाजरीच्या पिकाचे पाण्याअभावी नुकसान झाल्याचे सांगितले.

          शेतकऱ्यांशी संवाद साधताना पथकातील सदस्यांनी गावातील चाऱ्याची उपलब्धता, जनावरांसाठी पाणी, पीकविमा आदींची माहिती घेतली. चांदवड तालुक्यातील हरसूल शिवाराला भेट देऊन कांदा आणि टमाटा पिकाच्या नुकसानाची माहिती पथकाने घेतली.

          पथकासमवेत कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., जि.. बांधकाम सभापती मनीषा पवार, उपजिल्हाधिकारी वासंती माळी,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय अधिकारी भिमराव दराडे, तहसीलदार ज्योती देवरे, गट विकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
0 0 0

No comments:

Post a Comment