Thursday 20 December 2018

नाशिक पोलीस पुरस्कार


पोलिसांनी जबाबदारीसोबत आरोग्याकडेही लक्ष द्यावे- गिरीष महाजन


            नाशिक, दि.20- पोलिसांनी  जबाबदारीसोबत शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी  प्रयत्न करावे, तसेच आपल्या आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, वैयक्तिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
हॉटेल एक्सप्रेस इन येथे दैनिक दिव्य मराठीच्या सौजन्याने आयोजित    'नाशिक पोलीस पुरस्कार 2018 सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी  महापौर रंजना भानसी, आमदार सिमा हिरे, लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालक संजय बर्वे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या संचालिका अश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, संपादक संजय आवटे, निवासी संपादक जयपक्राश पवार आदी उपस्थित होते.

          श्री. महाजन म्हणाले, नागरिकांना  पोलीसांकडून मोठ्या अपेक्षा असतात. मात्र माणूस म्हणून त्यांना समजून घेत त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. समाजाकडून होणारे कौतुक त्यांच्यासाठी विशेष असते. यासाठी  दिव्य मराठीने त्यांच्यासाठी घेतलेला पुढाकार विशेष आहे.
जिल्ह्यात सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरात सिसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यात येत आहे. पोलीसांना निवृत्तीनंतर हक्काच्या घरात रहायला मिळावे यासाठी शासनपातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. नाशिकच्या पोलीस अकादमीने आजपर्यंत चांगले पोलिस अधिकारी दिले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

श्री. बर्वे म्हणाले, जनतेच्या चुका सुधारण्यासाठी त्यांना सावरण्यासाठी पोलीस सदैव तत्पर असतात. त्यांच्या चांगल्या कामाची समाजाकडून दखल घेण्यात येते.
       पुरस्कार आपल्या चांगल्या कामाची पावती असून आपण पोलीस चांगले काम करतील असा विश्वास श्री.सिंगल यांनी व्यक्त केला.
          पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सहायक पोलिस उपनिरीक्षक रवी शिलावट, सोमनाथ गेंगजे, सचिन वराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, पोलीस नाईक हरिश्चंद्र पालवी, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक सैय्यद नियाज उमराव अली, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस शिपाई शेखर पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक वामन टोचे, सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस शिपाई हेमंत लकडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिनेश बर्डेकर, पोलिस हवालदार डी.जे.आहिरे, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलिस उपनिरीक्षक रवी शिलावट, नयना आगलावे, शिरिष चव्हाण, ॲड. वाय.डी.कापसे, ॲड.दीपशिखा भीडे, समाधान वाघ, सहायक पोलिस निरीक्षक निसार अन्वर सैय्यद, योगेश लभडे, सहायक पोलिस उपनिरिक्षक समाधान गवळी, महिला पोलीस सुशीला आव्हाड, पूनम राऊत, सहायक पोलीस निरिक्षक तुकाराम नलावडे, सुनिल भामरे, पोलीस निरीक्षक दिपक देसले, पोलीस कॉन्स्टेबल पी.एस.निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, उमाकांत गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सचिन सावंत व भिमराव गायकवाड, पोलिस हवालदार एस.जे.मुंगसे यांनाही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

          याशिवाय महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे सहाय्यक संचालक मल्लिकार्जुन सुरवसे पोलीस उपअधिक्षक मधुकर सातपुते, पोलिस निरीक्षक सालीम शेख, पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे, पोलीस उपनिरिक्षक कुणाल चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक लक्ष्मी सपकाळे यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

       यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या मालेगाव मॅरेथॉनच्या  टी शर्ट व मेडल्सचेही अनावरण करण्यात आले.
0000

No comments:

Post a Comment