Thursday 6 December 2018

केंद्रीय पथकासमवेत बैठक


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय पथकासमवेत चर्चा

       नाशिक दि.6- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर विश्रामगृह येथे राज्यातील दुष्काळी परिस्थिची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाची भेट घेऊन चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीबाबत लवकरात लवकर केंद्राला अहवाल सादर करण्यात येईल असे यावेळी पथकातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
          पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी.देशपांडे, सहसचिव छावी झा, डिपार्टमेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए.के.तिवारी, एमएनसीएफसीच्या सहाय्यक संचालक डॉ.शालिनी सक्सेना यांचा समावेश होता.

           बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुष्काळाच्या तिव्रतेची माहिती सदस्यांना दिली. याबाबत केंद्राला लवकर अहवाल सादर केला जाईल असे सदस्यांनी यावेळी सांगितले.
          बैठकीस कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.
          केंद्रीय पथकाने जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबा.), मेहुणे आणि चांदवड तालुक्यातील हरसूल व हरणूल गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी पावसाअभावी पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
                                                          -----

No comments:

Post a Comment