Friday 21 December 2018

क्रेडाई एक्स्पो-2018


                बांधकाम क्षेत्राच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक
        - गिरीष महाजन


          नाशिक, दि.21- नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमीका असून लवकरच त्या दूर करण्यात येतील, अशी ग्वाही  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

          डोंगरे मैदानावर आयोजित ‘क्रेडाई नाशिक प्रॉपटी एक्स्पो-2018’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, योगेश घोलप, स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., क्रेडाईचे अध्यक्ष उमेश वानखेडे उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले, नाशिक शहराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे शहरात घर घेण्याकडे नागरिकांचा ओढा अधिक आहे. ‘रेरा’ कायद्यामुळे नागरिकांना फायदा होत असून सोबतच घराच्या किंमती कमी झाल्या असल्याने सध्याचे वातावरण घर घरेदीसाठी उत्तम आहे.   क्रेडाईने प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली घर खरेदीची पर्याय ठेवल्याने ग्राहकांना निश्चितच फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.  
          पालकमंत्री महोदयांचे हस्ते ‘क्रेडाई नाशिक प्रॉपटी एक्स्पो-2018’ चे माहिती पुस्तकिचे प्रकाशन करण्यात आले.
पालकमंत्री महाजन यांची खान्देशमहोत्सवाला भेट

        पालकमंत्री गिरीष महाजन यांनी ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या खान्देश महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सिमा हिरे, बाळासाहेब सानप, स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी आडके उपस्थित होते.

       पालकमंत्र्यांच्या त्यांच्या हस्ते खान्देशमहोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठोत्सव कार्यक्रमाचे बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी नागरिकांना सुरक्षित वाहतुकीचा संदेशही दिला. 



         ज्येष्ठ नागरिकांना सुप्त कला गुण व्यक्त होण्यासाठी खान्देश महोत्सवाच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले असून या भागातील संस्कृतीचे दर्शन महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना घडेल, असे श्री.महाजन यावेळी म्हणाले.
0000

No comments:

Post a Comment