Wednesday 24 January 2018

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम

विविध सांस्कृतिक कार्यक्रम  प्रजासत्ताक दिनाचे आकर्षण
नाशिक, दि.23:-भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त पोलीस परेड मैदान येथे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमातराष्ट्र प्रथमया संकल्पनेवर आधारीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख आकर्षण राहणार आहेत.
          ध्वजारोहणानंतर जिल्हा क्रिडा अधिकारी, उद्योग, पोलीस, जिल्हा जात  प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि नाशिक महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग आदी विविध विभागांचे पारितोषिक वितरण श्री.महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
यानंतर होणाऱ्या संचलनात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, आदिवासी विभाग, सामाजिक वनीकरण, निवडणूक शाखा, समाजकल्याण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), नाशिक महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जिल्हा परिषद आदींच्या चित्ररथाच्या माध्यमातून पंतप्रधान मातृवंदना योजना, मौखिक आरोग्य, आदिवासी संस्कृती आणि शिक्षण, पर्यावरण रक्षण, जलयुक्त शिवार, डिजीटल शाळा, स्वच्छ भारत अभियान, अवयवदान, प्रदुषण नियंत्रण आदी संदेश देण्यात येणार आहेत.
संचलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे. पालकमंत्री महाजन यांच्या सुचनेनुसार यावेळी प्रथमचराष्ट्र प्रथमही संकल्पना घेऊन विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. त्यात समर्थ योग संस्थेचा योग यज्ञ, भोसला मिलेट्री स्कुलचा ड्रील, फ्रावशी ॲकेडमीचे मल्लखांबसारडा कन्या शाळेचे देशभक्तीपर समुह गीत, केटीएचएम महाविद्यालयाचे लोकनृत्य, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाचे लेझीम, इस्पॅलिवर एक्सपरिमेंटल हायस्कूलचे ढोल पथक, न्यु इरा इंग्लिश मिडियम स्कुलचेबेटी बचावचा संदेश देणारे पथनाट्य, म्युझीक अँड डान्स इनिशिएटीव्हचे देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी अल्पोपहाराचीदेखील व्यवस्था कार्यक्रमस्थळी करण्यात येणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
                                                                   ----

No comments:

Post a Comment