Monday 15 January 2018

श्रद्धांजली

       शहीद योगेश भदाणे यांना ओझर विमानतळ येथे श्रद्धांजली     
                   

नाशिक  दि. 15 :  जम्मू-काश्मिर येथे शहीद झालेले जवान योगेश एम. भदाणे यांचे पार्थिव भारतीय वायुदलाच्या के. ए. 2764 या विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले. त्यांच्या विधवा पत्नी पुनम पार्थिवासोबत होत्या. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

आमदार अनिल कदम, वायुदलाचे एअर ऑफिसर कमांडिंग 11 बी.आर.डी एअर कमाडोर समीर बोराडे व्ही.एस.एम., ग्रुप कॅप्टन जे. मॅथ्यू, स्टेशन ॲडज्यूटंट एस. दुबे, सेनादलाचे मेजर रोहित खत्री, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किसन सातपुते, कल्याण संघटक ज्ञानदेव गुंजाळ यांनीदेखील श्रद्धांजली अर्पण केली.

शहीद भदाणे यांचे पार्थिव ओझर विमानतळावरुन धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील खलाणे या त्यांच्या मुळगावाकडे सेनादलाच्या विशेष डी 5 हेलिकॉप्टर आय.ए. 1105 द्वारे नेण्यात आले.
0000000

           

No comments:

Post a Comment