Friday 19 January 2018

आयमा इंडेक्स 2018

आदिवासी भागातील उद्योगांसाठी 65 कोटी-विष्णू सवरा

नाशिक, दि. 19:- ग्रामीण आदिवासी भागाच्या विकासासाठी या भागात येणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी 65 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले.
आयमा इंडेक्स 2018’ या औद्योगिक प्रदर्शनाला भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, प्रदर्शनाचे कार्यवाह धनंजय बेळे, उद्योजक यू. के. शर्मा, निखील पांचाळ आदी उपस्थित होते.

श्री. सवरा म्हणाले, ग्रामीण आदिवासी  डी डी प्लस उद्योगक्षेत्रात येणाऱ्या उद्योगांना वीजेसाठी या निधीतून सवलत देण्यात येणार आहे. आदिवासी भागातील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने कौशल्य विकास योजना राबवली आहे. यासाठी सीएसआर निधीचाही उपयेाग करण्यात आला आहे. या भागात उद्योग उभारले गेल्यास त्यांना प्रशिक्षीत युवक मिळतील युवकांना रोजगार मिळेल, असे त्यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शेतकरी, विद्यार्थी, आश्रमशाळा, वसतीगृहे   यांच्यासाठी विविध प्रकारचे साहित्याची आवश्यकता असते. ही खरेदी थेट उद्योजकांकडून करण्यात यावी अशी मागणी असून याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे उद्योजकांना देखील फायदा होईल, असेही श्री.सवरा म्हणाले.

यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध उद्योजकांच्या स्टॅाल्सला भेट देऊन पाहाणी केली उत्पादनांची माहिती घेतली.
शिष्यवृत्ती योजनेबाबत आढावा
 आदिवासी विकास मंत्री श्री. सवरा यांनी यापूर्वी शासकिय विश्रामगृह येथे आदिवासी विभागाच्यावतीने विद्यार्थ्याना देण्यात येत असलेल्या विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेबाबत माहिती घेतली.  यावेळी आदिवासी विकास आयुक्त आर.जी. कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सह आयुक्त संदिप गोलाईत, दशरथ पानमंद तसेच अभियांत्रिकी महाविद्यालये तंत्रनिकेतन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment