Saturday 27 January 2018

इंडीया पोल्ट्री एक्सो 2018


           पोल्ट्रीला प्रोत्साहन देण्याचे  शासनाचे धोरण-महादेव जानकर

नाशिक, दि.27: पोल्ट्री उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून त्यामाध्यमातून राज्यात अंडी व ब्रायलरचे उत्पादन वाढवण्यासाठी  शासन सर्व सुविधा देईल, पोल्ट्री उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे  शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्सव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी  केले.

 दोन दिवसीय  इंडीया पोल्ट्री एक्सो 2018 च्या उद्घाटन प्रसंगी  ते  बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, प्रदर्शनाचे आयोजक मनोज शर्मा, पीपल फॉर पोल्ट्री संघाचे अध्यक्षा वसंत कुमार, अरुण पवार, व्यंकटार, डॉ. पी.जी. पेडगावकर आदी  उपस्थित होते.
मंत्री श्री. जानकर  म्हणाले, राज्यात अंडी व चिकनची मागणीच्या प्रमाणात उत्पादन होत नाही त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून पुरवठा होत आहे. या व्यवसायात उद्योगांसारखा रोजगार देण्याची क्षमता आहे. पोल्ट्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत, असे ते  म्हणाले.

याप्रसंगी आमदार  सीमा हिरे, डॉ. पेडगावकर, वसंतकुमार, श्री. शुक्ला  व श्री.पवार यांनी  विचार व्यक्त केले.
यावेळी मंत्रमहोदयांनी प्रदर्शनाला भेट देऊन पाहाणी केली. प्रदर्शन 27 ते 29 जानेवरी 2018 या  कालावधीत  ठक्कर  डोम येथे सुरु राहाणार  असून पोल्ट्री उद्योगासाठी लागणारे फिड, पशूंची औषधे व शेड उभारणीसाठी लागणारे  विविध साहित्य प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. या व्यवसायाबात मार्गदर्शन व चर्चासत्रे या  दोन दिवसात होणार आहेत.
000000
          

No comments:

Post a Comment