Friday 26 January 2018

मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

नाशिक दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान  येथे  आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, जि..अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजनाताई भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडे, आदिवासी विकास आयुक्त रामचंद्र कुलकर्णी,  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, पोलीस विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त डॉ.अभिषक कृष्णा, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीनादी उपस्थित होते.

श्री.महाजन यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परेड कमांडर विजयकुमार चव्हाण, सेकंड परेड कमांडर सुरेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलीस आयुक्तालय नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, होमगार्ड, शहर वाहतूक शाखा, वनविभाग, अग्नीशामक दल, भोसला मिल्ट्री स्कुलचे सहा पथक, इस्प्लेअर स्कुल, बँड पथक, भोसला मिल्ट्री स्कुल घोडदल, डॉग युनिट वाहन, जलत प्रतिसाद पथक आदी पथकांनी सहभाग घेतला.

संचलनाच्यावेळी चित्ररथातून सामाजिक जागृतीचे संदेश देण्यात आले. पंतप्रधान मातृवंदना योजना, मौखिक आरोग्य, आदिवासी संस्कृती आणि शिक्षण, पर्यावरण रक्षण, जलयुक्त शिवार, डिजीटल शाळा, स्वच्छ भारत अभियान, अवयवदान, प्रदुषण नियंत्रण, चाईल्ड लाईन, बाल विवाह प्रतिबंध, आदी संदेश चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आले. आदिवासी विकास विभागाचा चित्ररथ विशेष आकर्षण ठरला. या चित्ररथाद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्याबरोबरच आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे राष्ट्र प्रथमचा संदेश


पालकमंत्री  महाजन यांच्या संकल्पनेनुसारराष्ट्र प्रथमया संकल्पनेवर आधारीत विविध  सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सर्व प्रकारचे भेद विसरून राष्ट्रासाठी ऐक्य कायम ठेवण्याचा संदेश देण्यात आला.  समर्थ योग संस्थेनेयोग यज्ञकार्यक्रमाच्या माध्यमातून योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.  भोसला मिलेट्री स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार ड्रील सादर केले. फ्रावशी ॲकेडमीची चित्तथरारक मल्लखांब प्रात्यक्षिकांना प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सारडा कन्या शाळेचे देशभक्तीपर समुह गीत, केटीएचएम महाविद्यालयाचे लोकनृत्य, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाचे लेझीम, इस्पॅलिवर एक्सपरिमेंटल हायस्कूलचे ढोल पथक, न्यु इरा इंग्लिश मिडियम स्कुलचेबेटी बचावचा संदेश देणारे पथनाट्य, म्युझीक अँड डान्स इनिशिएटीव्हचे देशभक्तीपर नृत्य देखील वैशिष्ट्यपूर्ण ठरले. जिल्हा परिषद शाळा पेठच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याचे उपस्थितांनी कौतुक केले. लयबद्ध अशा या नृत्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेले मनोरे वैशिष्ट्यपूर्ण होते. त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण

पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दिपक गायकवाड, देविदास इंगळे, शिवाजी खुळगे, शिवाजी फुगट, हेमंत बेळगावकर, बाळासाहेब लहांगे, अविनाश सोनवणे यांना  राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक प्रदान करण्यात आले.
 इगतपुरीचे सहा.पोलीस निरीक्षक महेश मांडवे, पिंपळगाव बसवंतचे पोलीस उप निरीक्षक भरत चौधरी, मालेगां छावणीचे पोलीस उप निरीक्षक राहुल कोलते आणि राहुल पाटील, येवला शहराचे पोलीस उप निरीक्षक संदिप पाटील आणि सटाणाचे पोलीस उप निरीक्षक गणेशपुरी बुवा, पोलीस उप अधिक्षक पी.टी.सपकाळे यांचा पोलीस महासंचालकांच्या विशेष सेवा पदकाने गौरव करण्यात आला.

जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अविनाश देशमुख (रोईंग), गुणवंत कार्यकर्ता रवींद्र मेतकर (ज्युदो), तसेच गुणवंत खेळाडू प्राजक्ता खालकर निकीता काळे (वेट लिफ्टींग), राहुल पडोळ (तलवारबाजी), मयुर देवरे (शरीर सौष्ठव) यांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
जिल्हा उद्योग पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय लघुउद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मे.संजित इन्स्टुमेंट्स प्रा.लि. आणि मे.भिंगे ब्रदर्स ांनाही यावेळी पुरस्कृत करण्यात आले.

विभागीय आयुक्तालय कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण


भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, महसूल उपायुक्त दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, गितांजली बावीस्कर, विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

 भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर उपजिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, सोपान कासार,  तहसीलदार गणेश राठोड, राजश्री अहिरराव तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
---

No comments:

Post a Comment