Thursday 11 January 2018

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव

निवृत्तीनाथ महाराज मंदिर पुर्ननिर्माण कामासाठी स्वतंत्र अधिकारी-पालकमंत्री

नाशिक, दि. 12:- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुर्ननिर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकिय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, वैद्यकिय शिक्षण खार जमीन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त  निवृत्तीनाथ महाराज समाधीची पालकमंत्री श्री. महाजन यांनी पत्नी साधनाताई यांच्यासह आज पहाटे शासकिय महापूजा केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, निर्मला गावित, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मंदिर संस्थानचे अध्यक्ष ... संजय महाराज धोंगडे, श्रीकांतजी भारती, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, मुख्याधिकारी चेतना केरुरे आदी उपस्थित होते.

          श्री. महाजन म्हणाले, समाधिस्थळाचे  पावित्र्य आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेमुळे मंदिराचे वेगळे महत्व आहे. भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी मंदिराची वास्तू नव्याने उभारण्यात  येत आहे. काळ्या पाषाणात मंदिराची सुंदर आणि भव्य वास्तू उभी राहणार आहे. कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. परिसरातील निसर्ग आणि तीर्थस्थळाचे महत्व लक्षात घेता पर्यटन विकासाला  चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, कुंभमेळ्याची जागतिक वारसा म्हणूनयुनेस्कोने नोंद घेतली असून यानिमित्ताने त्र्यंबकेश्वरची वेगळी ओळख जगासमोर आली आहे. संत निवृत्तीनाथ यात्रानिर्मल वारीहोण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. विविध संघटना, सामाजिक संस्थाच्या सहाय्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंढरपूर आळंदी प्रमाणेच निर्मलवारीचा संकल्प पुर्ण होईल, असा विश्वास श्री.महाजन यांनी व्यक्त केला.
यावेळी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ सदस्य, प्रमुख नागरीक, भाविक मोठ्या संख्येने होते.


सारशी येथील ठाकरे दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान

शासकिय पूजेनंतर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सारशी येथील सौ.आरती अनिल शंकर ठाकरे या दाम्पत्यांला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला. मंत्रीमहोदयांच्या हस्ते ठाकरे दाम्पत्याचा त्यानंतर दर्शन घेणारे भिवंडी तालुक्यातील सागाव येथील रुपाली रघुनाथ पाटील दामप्त्याचा सत्कार करण्यात आला.

000000

No comments:

Post a Comment