Sunday 8 April 2018

सामाजिक समता सप्ताह


सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन
नाशिक, 8 : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 8 ते 14 एप्रिल 2018 या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते करण्यात आले.

सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला महापौर रंजनाताई भानसी, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, समाज कल्याण उपायुक्त राजेंद्र कलाल, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, एस.बी. त्रिभुवन आदी उपस्थित होते.

सप्ताहाच्या ‍निमत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार आणि सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जावी, अशी अपेक्षा आमदार सानप यांनी व्यक्त केली. डॉ.आंबेडकर यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे महिलांना विविध क्षेत्रात विकासाची संधी प्राप्त झाली, असे श्रीमती भानसी यांनी सांगितले.

श्री.कलाल यांनी सप्ताहाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. सप्ताहाच्या माध्यमातून  जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
                                                 -----

No comments:

Post a Comment