Monday 9 April 2018

पतसंस्था उद्घाटन


          सहकार क्षेत्राची विश्वासार्हता जपणे महत्वाचे-सुभाष देसाई

          नाशिक दि.9- जनतेचा विश्वास संपादन केल्यास सहकार क्षेत्राच्या विकासाबरोबरच ग्रामीण विकासाला चालना मिळणार असल्याने सहकार क्षेत्राची विश्वासार्हता जपणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
          सिन्नर येथील कुंदेवाडी गावात श्री जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा शितल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष  किरण डगळे, पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे, विजय करंजकर, भास्कर कोठावदे आदी उपस्थित होते.

          श्री.देसाई म्हणाले, सहकार क्षेत्राशी अनेक नागरिकांचा विश्वास जोडला गेला आहे. त्याबरोबर नागरिकांचा आर्थिक विकासही या क्षेत्रावर अवलंबून आहे. सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे या क्षेत्राला पुढे नेणे आणि उत्तम व्यवहाराच्या माध्यमातून जनतेचा विश्वास कायम ठेवणे महत्वाचे आहे.
-----

1 comment:

  1. MAAC Nashik institute is the best vfx courses in nashik & Advanced Diploma in visual effects training institute in nashik. MAAC Nashik offers career courses in Animation, graphics and web designing, vfx courses in nashik. MAAC Nashik helps students get the best job placements.

    ReplyDelete