Friday 6 April 2018

राज्य सेवा (पुर्व) परिक्षा


राज्य सेवा (पुर्व) परीक्षा 2018 च्या बैठक व्यवस्थेत बदल

            नाशिक दि.6- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  रविवार 8 एप्रिल 2018 रोजी घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा (पुर्व) परिक्षा 2018 च्या दोन परिक्षा केंद्रामध्ये बदल करण्यात आला आहे.
          उपकेंद्र क्रमांक 2 के.के.वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड रिसर्च सेंटर, हिराबाई हरिदास  विद्यानगरी, अमृतधाम,पंचवटी नाशिक येथील बैठक क्रमांक NS002001 ते NS 002480 या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था के.के.वाघ इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक, हिराबाई हरिदास  विद्यानगरी, अमृतधाम,पंचवटी नाशिक या इमारतीत करण्यात आली आहे. तसेच उपकेंद्र क्रमांक 16 एस.एम.आर.के.बी.अे.के.महिला महाविद्यालय, कॉलेज रोड, नाशिक येथील बैठक क्रमांक NS016001 ते NS016360 या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सर डॉ.मो.स.गोसावी महाविद्यालय, कृषी नगर, जॉगींग ट्रॅक शेजारी, नाशिक येथे करण्यात आली आहे.
          वरील केलेल्या बदलाच्या अनुषंगाने  विद्यार्थ्यांनी त्यांच्या आसन क्रमांकाप्रमाणे नेमून दिलेल्या केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे. वरील बदलानुसार संबंधित उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये सुधारित प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच उमेदवारांना आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल दुरध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे.
           वरील दोन केंद्रावरील परिक्षार्थी यांना काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी जिलहाधिकारी कार्यालय, नाशिक येथे श्री. संजय फिरके (9890031811) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  नाशिक यांनी केले आहे.
*******

No comments:

Post a Comment