Thursday 12 April 2018

समाज भवन उद्घाटन


वंजारी समाज भवनाचे ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन


            नाशिक दि.12- ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे  यांच्या हस्ते  नाशिक येथील वंजारी समाज भवनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह वंजारी समाज उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


       श्रीमती मुंडे म्हणाल्या, नूतन इमारतीच्या माध्यमातून समाजाच्या चांगल्या कामाची सुरुवात झाली आहे. सामुहिक विवाह सोहळा या संकल्पनेवर समाजातील लोकांनी भर द्यावा व लग्नात होणारा खर्च वाचवून तो वधू-वरांच्या भावी आयुष्यासाठी उपयोगी आणावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वंजारी समाजामार्फत करण्यात येणाऱ्या सकारात्मक कामांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
000

No comments:

Post a Comment