Saturday 13 May 2017

‘गाळमुक्त धरण’ झोडगे शुभारंभ

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचा झोडगे येथे शुभारंभ

प्रा.शिंदे यांनी झोडगे येथे ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत कामाचा शुभारंभ केला. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार डॉ.राहुल आहेर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री.शिंदे म्हणाले, पाणी उपसण्याच्या स्पर्धेचे जलसंधारणाच्या स्पर्धेत रुपांतरीत करावे. जलनियोजन उत्तम प्रकारे करणारे गावाच भविष्यात प्रगती करू शकणार आहे. पाणीसाठे मर्यादीत असून पाण्याशिवाय शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. शासनाने म्हणूनच शासनाने योजना राबविण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. दोन वर्षात राज्यात पाच हजार टँकरऐवजी  केवळ सातशे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. अभियानाचे यश पहाता भविष्यात राज्य टँकरमुक्त निश्चितपणे होईल. झोडगे येथील कामाने भविष्यात गावाला टंचाई भासणार नाही. कामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, मात्र कामाचा दर्जा चांगला राखावा, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर श्री.शिंदे यांनी सोग्रस येथील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना भेट देऊन पाहणी केली. राजदेरवाडी येथील गाळ काढण्याच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. येथील पाझर तलावाची उंची वाढविण्यात येईल, अशी ग्वाही श्री.शिंदे यांनी यावेळी दिली. तलावाची आवश्यक दुरुस्ती तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

०००००

No comments:

Post a Comment