Saturday 13 May 2017

सप्तश्रृंग गडाला भेट

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची सप्तश्रृंग गडाला भेट
                 
                                                           
नाशिक दि.13- पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी श्री सप्तश्रृंग गडाला भेट देऊन फनिक्युलर ट्रॉलीच्या कामाची पाहणी केली. 1 ऑगस्ट पर्यंत  काम पुर्ण करून ट्रॉली भाविकांसाठी सुरू करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
श्री.रावल यांनी ग्रामस्थ आणि श्री सप्तश्रृंग निवासीनी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज, प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, सुदर्शन दहातोंडे आदी उपस्थित होते.

श्री.रावल यांनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आणि परिसराची पाहणी केली. पर्यटनाच्यादृष्टीने गडाचा विकास करण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

------

No comments:

Post a Comment