Friday 5 May 2017

कोषागार प्रणाली बंद

कोषागार कार्यालयाशी संबंधित विविध प्रणाली 14 मे पर्यंत बंद

नाशिक, दि.5 :- वित्त विभागाच्या अधिनस्त असलेले जिल्ह्यातील कोषागार,  उपकोषागार कार्यालयाशी संबंधीत बिम्स, सेवार्थ, निवृत्तीवेतन, बिलपोर्टल, एनपीएस, वेतनिका, कोषवाहिनी आणि अर्थवाहिनी या सर्व ऑनलाईन प्रणाली अद्ययावत करण्यात येणार असल्याने 6 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 11 मे 2017 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
मुद्रांक विक्रेते आणि करदात्यांशी संबंधीत ग्रास प्रणाली 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 14 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तत्पुर्वी मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांकाचा पुरेसा साठा प्राप्त करून घ्यावा. सर्व आहरण आणि संवितरण अधिकारी, मुद्रांक विक्रेते आणि निवृत्तीवेतनधारक यांनी याबाबत नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे यांनी  कळविले आहे.

----

No comments:

Post a Comment