Monday 1 May 2017

सायबर पोलीस स्टेशन

पोलीस आयुक्तालय येथे सायबर पोलीस स्टेशनचे उद्घाटन

नाशिक, दि. 1:- पोलिस आयुक्तालय येथे सुरू करण्यात आलेल्या सायबर पोलीस स्टेशनचे  तसेच  सायबर गुन्ह्याबाबत तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे  उद्घाटन पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, उपआयुक्त दत्तात्रय कराळे, विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल पवार, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

गतवर्षी स्वातंत्र्यदिनी पोलीस आयुक्त कार्यालयात ‘सायबर कक्ष’ सुरू करण्यात आला होता. आतापर्यंत या माध्यमातून 40 गुन्ह्यांची नोंद झाली असून 35 उघडकीस आले आहेत. 33 जणांना अटक करण्यात आली असून 5 लाख 10 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. झारखंड येथील एका आरोपीचा शोध घेण्याच्या कामगिरीबाबत दिल्ली पोलीसांनीदेखील देखल घेऊन माहिती घेतली आहे, अशी माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करणे नागरिकांना सोईचे होणार आहे.

----

No comments:

Post a Comment