Thursday 11 May 2017

अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई

अनधिकृत फ्लेक्स-होर्डींग्जवर कारवाईसाठी नोडल अधिकारी नियुक्त

नाशिक दि.11 –अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डींग्ज, पोस्टर्स आदी संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्र वगळता जिल्ह्यातील अन्य क्षेत्राकरीता तालुकास्तरावर निवासी नायब तहसिलदार यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नोडल अधिकारी म्हणून नियूक्त केलेल्या नायब तहसिलदारांची तालुकानिहाय नावे व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. नाशिक तालुक्यासाठी ए.डी.शेवाळे (0253-2575663), दिंडोरी- श्रीमती पी.के. टाकळे (2557-221003), इगतपुरी-एस.एन.शिंदे (02553-244009), पेठ-एच. एन. झिरवाळ (02558-225531), त्रंबकेश्वर-एम.पी.कनोजे (02594-233355), निफाड-संघमित्रा बाविस्कर (02550-241024), येवला-एस. ए. पठारे  (02559-265005), सिन्नर-डी.वाय.वायचळे (02551-220028), मालेगांव-वसंत पाटील (02554-254732), चांदवड-आर.व्ही.सुराणा (02556-252231), नांदगांव श्रीमती एस.एस.बैरागी (02552-242232), कळवण- ममता भंडारे (02592-221037), सुरगाणा- एस.आर.बकरे (02593-223323), बागलाण-ए.ए.तांबे (02555-223038) आणि देवळा- ए.आर.चव्हाण (02592-228554).
000000


No comments:

Post a Comment