Saturday 13 May 2017

सोमेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण

नाशिकच्या पर्यटन विकासासाठी सर्व सहकार्य-जयकुमार रावल
                                                                 
           
नाशिक दि.13- नाशिक शहर परिसरात धार्मिक पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल,अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
सोमेश्वर मंदिर परिसरातील गोदाकाठ सुशोभिकरण कामाच्या भूमीपुजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे आदी उपस्थित होते.

श्री.रावल म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी 12 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोमेश्वर येथे एक कोटींची कामे करण्यात येणार आहे. पर्यटन विकासासाठी सुरू करण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र अनलिमीटेड’ प्रकल्पांतर्गत नाशिकला विशेष स्थान देण्यात येईल. जिल्ह्यात विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शहरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी अनुकूल वातावरण तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात श्रीमती हिरे यांनी सोमेश्वर परिसराचा विकासाचा शुभारंभ होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

---

No comments:

Post a Comment