Friday 16 September 2016

नाशिक साखर कारखाना लवकर सुरु होणार-गिरीष महाजन


नाशिक दि.17- नाशिक, इगतपुरी, सिन्नर व त्रंबक तालूक्यातील  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी नाशिक   सहकारी साखर कारखाना लवकर सुरु करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोबत आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस खासदार  हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप, आमदार निर्मलाताई गावीत, देविदास पिंगळे तसेच नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी व सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सदर कारखाना सुरु होण्याकरीता प्राधिकृत मंडळ नेमण्यात यावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वानी एकत्र येऊन  पुढाकार घ्यावा. सहकारी कारखाना सुरु करण्यास हमीद्वारे  निधी उपलब्ध होऊ शकेल व त्याद्वारे येत्या हंगामात शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना लवकरच सुरु करण्यात येईल, असे श्री.महाजन यांनी सांगितले. आमदार बाळासाहेब सानप यांनी सदर बैठक घेण्याबाबत पालकमंत्री महोदयांना निवेदन दिले होते.
                                               ---- 

No comments:

Post a Comment