Wednesday 21 September 2016

              स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून नाशिकचा सर्वांगिण विकास 
     -गिरीष महाजन

         
नाशिक, दि.21 :- स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश नाशिक शहराचा समोश झाल्याने या योजनेच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच लोकांचे जिवनमान उंचावत शहराचा सर्वांगिण विकास करण्यात येईल,  असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी  केले.
          श्री.महाजन यांनी   जिल्ह्यातील विविध विकास कामे , कायदा-सुव्यवस्था आदी बाबींचा आढावा घेतला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर आदी उपस्थित होते.
          ते म्हणाले, शहराची वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा शाश्वत पुरवठा, विकासामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य सुविधांचा विकास ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यामतून होणार आहे. या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी सक्षम यंत्रणा राबवली जाईल. तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्नही या अंतर्गत होणार आहेत. शहरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. शहर ‘स्मार्ट’ आणि विकसीत करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि आधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवहान त्यांनी केले.
या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये नाशिकची निवड झाली असून या योजनेत सहभागी शहरांना एक हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त्‍ा होणार आहे. विकास कामांसाठी निधी कमी पडू नये यासाठी आंतराष्ट्रीय वित्त संस्थेकडून कर्जाद्वारे निधी उभारला जाईल, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

                                                                                                          000000

No comments:

Post a Comment