Monday 26 September 2016

जिल्हा परिषद निवडणूक गण प्रसिद्धीपूर्वी सभेचे आयोजन
नाशिक, दि. 26: जिल्हा परिषद निवडणूकीसाठी निवडणूक विभाग आणि निर्वाचक गण प्रसिद्ध करण्यापूर्वी विशेष सभा 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी परिसरातील नियोजन भवन विशेष सभा होणार असून इच्छुकांनी वेळेवर हजर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी केले आहे. या विशेष सभेत सोडत पद्धतीने कार्यवाही करुन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाचा जागा निश्चित करण्यात येणार आहेत.
पंचायत समित्या निवडणूकींचे तालुकांसतरावर सभा आयोजित करण्यात येणार आहेत. पंचायत समिती निवडाणूकीसाठी बागलाण, देवळा, कळवण, इगतपुरी आणि पेठ साठी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता संबंधित पंचायत समिती सभागृहात विशेष सभा होईल.
नांदगाव, येवला, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबक आणि सिन्नर साठी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता संबंधित  तहसील कार्यालयात सभा होईल. तर पंचायत समिती मालेगावसाठी तेथील प्रांत कार्यालयात,पंचायत समिती निफाडसाठी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात, पंचायत समिती चांदवडसाठी तेथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृहात 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सभा होईल. नाशिक पंचायत समितीची विशेष सभा नियोजन सभागृह येथे  5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होईल.

--------

No comments:

Post a Comment