Wednesday 14 September 2016

सीसीटीव्हीबाबत तात्काळ कार्यवाही पुर्ण करा-गिरीष महाजन

नाशिक, दि. 14: गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील सीसीटीव्हीचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे, असे निर्देश  राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे सकाळी कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, जिल्हा पोलीस आयुक्त रविद्र सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, अपर आयुक्त अनिल चव्हाण, पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले, सीसीटीव्हीसाठी जागा निश्चित करताना नागरिकांची मते लक्षात घेण्यात यावी. गुन्हेगारी कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. अवैध धंद्यांविरोधातही कडक कठोर  धोरण अवलंबण्यात यावे. जिल्ह्यातील  गुंडगिरी नष्ट करण्यासाठी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी. गुन्हेगारी प्रवृत्ती शहरात डोक काढणार नाहीत याबाबत सतर्कता बाळगावी,असे त्यांनी सांगितलेगेल्या काही महिन्यात शहरातील गुन्हेगारी विरोधात पोलीसांनी विशेष मोहिम राबविल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे श्री.महाजन म्हणाले.   शहरातील शांतता सुव्यवस्थेचे वातावरण राहील यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

----

No comments:

Post a Comment