Monday 26 September 2016

पात्र नागरिकांना 14 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
नाशिक, दि. 26: भारत निवडणुक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पुर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना  14 ऑक्टोबर 2016 पर्यंत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत पात्र नागरिकांना विहित नमुने भरणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6, अनिवासी मतदार नोंदणीसाठी नमुना 6 अ, मतदार यादीत आक्षेप किंवा नाव वगळण्यासाठी नमुना 7, मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलात दुरुस्तीसाठी नमुना 8 आणि मतदार यादीतील नोंदीचे स्थलांतर करण्यासाठी नमुना 8 अ भरणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र स्थळ आणि मतदार मदत केंद्रावर 9 ऑक्टोबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तर 5 जानेवारी 2017 रोजी मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांनी सहभाग घ्यावा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जागृत मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी केले आहे.  

-----

No comments:

Post a Comment