Thursday 15 September 2016

 ‘संवाद पर्वमध्ये स्वच्छ महाराष्ट्र - हरीत महाराष्ट्र


       नाशिक, दि. 15 :- गणेशोत्सव विसर्जनाचे वेळी पर्यावरण पूरक उपक्रम राबवताना जनप्रबोधनासाठी स्वच्छ महाराष्ट्र- हरीत महाराष्ट्रचा संदेश संवाद पर्वच्या माध्यमातून देण्यात आला. पालवी समाजसेवी संस्थेच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जूना गंगापूर नाका परिसरातील पाटील पार्क येथेसंवाद पर्व’  उपक्रम राबवण्यात आला.  याप्रसंगी कौशल्य विकास अधिकारी सुधाकर पाटील, प्रदिप गावित, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक सुरेश जाधव आणि माहिती अधिकारी किरण वाघ, पालवी समाजसेवी संस्थेच्या डॉ.सुवर्णा पवार, दिपाली खेडकर, डॉ.राजश्री कुटे आदी उपस्थित होते.

 याप्रसंगी उपस्थितांना वन जलयुक्त शिवार, मुद्रा बँक, स्वंयरोजगारातील संधी , आरोग्य, पाणी परिक्षण आणि शासनाच्या विविध योजना, संकेतस्थळे, महत्वाचे शासन निर्णय यांची माहिती देण्यात आली. स्वच्छता आणि वृक्ष लागवडीचे आवाहन यावेही करण्यात आले. उपस्थितांना शासनाची योजनांच्या पुस्तिका, माहितीपत्रके देण्यात आली. माहिती विभागाचे मनोज अहिरे, साहेबराव जगताप, कौशल्य विकास विभागाचे कोळपकर व वैभव कातकाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी पालवी समाजसेवी संस्थेचा पुढाका

नदी नाले प्रदुषण मुक्त राखण्यासाठी गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात गोदावरी नदीच्या पाण्यात करण्यात येऊ नये यासाठी नागरीकांमध्ये पालवी सोशल इनिशिएटीव्ह या संस्थेने जनजागृती उपक्रम राबविले आहेत.
जुना गंगापूर नाका पाटील पार्क येथील शंभर- सव्वाशे कुटुंबियांना गणपतीचे विसर्जन करता यावे यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या उद्यानात गणेशोत्सवाच्या ठिकाणी मोठे पिंप, टब आदींचा वापर करुन गणेश विसर्जनाची सुविधा करून देण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. गणोशोत्सवातील पावित्र्य राखले जावे आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे यासाठी संस्थेने हा उपक्रम राबविला आहे.

            संस्थेने यापूर्वीदेखील जलयुक्त शिवार, वनीकरण, स्वच्छता अभियान आणि विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक जाणिवेतून एकत्र आलेल्या महिलांनी उपक्रमांच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे कार्यदेखील केले आहे.  संस्थेच्या डॉ.सुवर्णा पवार, दिपाली खेडकर, मीता सहानी, विवेकानंद उमराणी,जमनालाल देवी, रितू गोयल, मोना गुलाटी, श्रद्धा गावंडे, कुंदा भालेराव, अश्विनी भामरे, ललीत सांगळे आदींचा या उपक्रमात सहभाग आहे.

                                       ****************

No comments:

Post a Comment