Monday 26 September 2016

मुद्रा बँक योजनेमुळे  रोजगार निर्मितीला चालना
चांदवडच्या खंडू जाधव यांच्या कलेला मिळाला वाव

नाशिक दि.20- चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द  या छोट्याशा गावात खंडू विठ्ठल जाधव यांना मुद्रा बँक योजनेतून 50 हजार कर्ज  मिळाल्याने त्यांच्या कलेला वाव मिळून रोजगारही उपलब्ध झाला आहे.
 श्री.जाधव मुद्रा कर्ज मिळण्याआधी कुंभारकाम व्यवसाय करत होते. या योजनेची माहिती वृत्तपत्रातून मिळाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या लासलगाव शाखेतून त्यांनी योजनेची  सविस्तर माहिती मिळविली .आवश्यक कागदपात्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना शिशूस्तरांतर्गत दिले जाणारे 50 हजाराचे कर्ज मिळाले. 
          मिळालेल्या कर्जातून जाधव यांनी मुर्त्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. गणपती उत्सवात गणेशमूर्ती, पोळ्याला मातीचे बैल, नवरात्रोत्सवात देवींच्या आणि इतरही मुर्त्या ते आपल्या बोटांच्या कलेतून साकार करतात. यातून चांगला धनलाभही त्यांना  होत आहे
पूर्वी साधारण वर्षाला 50 हजार  असणारे उत्पन्न आता 2 लाख वर पोहोचले आहे. यापुढे चांगला व्यवसाय वाढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. मुद्रा बँक योजनेमुळे केवळ व्यवसायलाच चालना न मिळता कलेलाही प्रोत्साहन मिळाल्याने व्यवसाय वाढविण्याचा उत्साह राहतो, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. संसाराचा गाडा सुरळीत चालविण्यासाठी हा व्यवसाय उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणतात.
           ‘मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  एप्रिल 2015 मध्ये  ही योजना सुरू केल्याने बेरोजगारांना रोजगार आणि व्यवसायाची नवी संधी निर्माण झाली आहे
          योजनेअंतर्गत शिशु , किशोर आणि तरुण या प्रकारात त्रिस्तरिय कर्ज वाटप करण्यात येते. या गटातील लाभार्थ्यांना देण्यात येणारी कर्जाची रक्कम  अनुक्रमे दहा हजार ते पन्नास हजार, पन्नास हजार ते पाच लाख आणि पाच लाख ते दहा लाख अशी आहे. ग्रामीण भागातील कुटिरोद्योग तसेच शहरी भागातील लहान आणि मध्यम उद्योगांना या योजनेमुळे चालना मिळणार आहे.
लाभार्थी
लाभार्थी संख्या
कर्जवाटप
शिशू
8412
25 कोटी 11 लाख
किशोर
4029
85 कोटी 30 लाख
तरुण
1180
89 कोटी 87 लाख
एकूण
13621
200 कोटी 29 लाख

शासनाने सुरू केलेली योजना महत्त्वाची असून पुढील काळात मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्मिती होऊन रोजगार देखील प्राप्त होणार आहे. त्यातून खंडू जाधव यांच्यासारख्या अनेकांना आर्थिक उन्नतीचा मार्ग गवसेल.
         

                                                             -----

No comments:

Post a Comment