Saturday 15 September 2018

लोकराज्य वाचक मेळावा


परिश्रमाद्वारे स्वत:चे आदर्श व्यक्तिमत्व घडवा-रविंद्र सिंघल

नाशिक दि.15- निश्चित उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन परिश्रमाद्वारे स्वत:चे आदर्श व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न युवकांनी करावा, तसेच देदीप्यमान कामगिरी करीत कुटुंबियांना अभिमानाची भावना व्यक्त करण्याची  संधी द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी केले.

परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे जिल्हा माहिती कार्यालय व अस्तित्व ॲकेडमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व लोकराज्य वाचक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाशिक विभागाचे उपायुक्त दिलीप स्वामी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, नुकतेच राज्यकर उपायुक्त परिक्षा उत्तीर्ण झालेले आसिर शेख, प्राध्यापक रमेश वाघ, अस्तित्व ॲकडमीचे संचालक लखन अग्रवाल आदी उपस्थित होते.

श्री.सिंगल म्हणाले, उत्तम वाचन, चांगल्य लिखाणाची सवय आणि विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेऊन आदर्श व्यक्तिमत्व घडविता येते. स्वत:च्या मर्यादा ओळखून प्रयत्नपूर्वक त्यावर मात करण्याचा प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. नियमांचे पालन करण्याची सवय आतापासून ठेवल्यास समाज निर्मितीत चांगले योगदान देता येईल, असे त्यांनी सांगितले.


शासनाच्या योजना, निर्णय व ध्येयधोरण याबाबत माहिती देणारे लोकराज्य एकमेव मासिक असुन स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य प्रेरणादायी असल्याचे डॉ.सिंगल म्हणाले. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून समाजसेवेच्या भावनेने युवकांनी प्रशासनात यावे, असेही त्यांनी सांगितले.


श्री. स्वामी म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक माहिती लोकराज्यच्या माध्यमातून मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकराज्य मासिक उपयुक्त उपयुक्त आहे. लोकसेवेचा विचार मनात घेऊनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करावी.  उत्तम यशासाठी संपर्क, समन्वय, संनियंत्रण, संयम व समाधान या पाच चा वापर आपल्या आयुष्यात करावा, असे त्यांनी सांगितले.

आसिर शेख यांनी स्पर्धा परिक्षेचे स्वरुप आणि त्याच्या पूर्वतयारीविषयी माहिती दिली. तर श्री.वाघ यांनी विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांचा उचित उपयोग करताना वेळेचे योग्य नियोजन करावे, असे सांगितले.
श्री.सिंगल यांच्या हस्ते लोकराज्यच्यासामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचेविशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.मोघे यांनी यावेळी लोकराज्य वाचक अभियान व माहितीदूत उपक्रमाची माहिती दिली. श्री.अग्रवाल यांनी आभार व्यक्त केले.
***********


No comments:

Post a Comment