Saturday 1 September 2018

वसतिगृह प्रवेश आवाहन


वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक दि.1- डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेतंर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी नाशिक येथे शैक्षणिक वर्ष सन 2018-19 साठी वसतिगृह सुरु करण्यात येत असून नाशिक येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी 11 सप्टेंबर 2018 पर्यंत तंत्रशिक्षण सहसंचालक विभागीय कार्यालय नाशिक येथे अर्ज सादर करावे.
विद्यार्थ्याचे नाशिक शहरात स्वत:चे निवासस्थान नसावे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी करून विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देण्यात येईल. अधिक माहितीसाठी  दूरध्वनी क्र. 0253-2461479 येथे संपर्क साधावा असे, सदस्य सचिव तथा सहसंचालक तंत्रशिक्षण सहसंचालक विभागीय कार्यालय, नाशिक यांनी कळविले आहे.
************

No comments:

Post a Comment