Wednesday 5 September 2018

पोषण माह


पोषण माहनिमित्त खंबाळे येथे पाककृती स्पर्धा

       नाशिक दि. 7 :- राष्ट्रीय पोषण माहनिमित्त खंबाळे येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा आणि अंगणवाडी सेविकांसाठी पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोषणयुक्त आहारातील विविध पाककृतींचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले.
          शहरात पोषणयुक्त आहाराचा संदेश देण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सात्विक भोजन संकल्पनेवर आधारीत विविध पाककृती तयार करण्याची माहिती दिली.

          पोषण सप्ताहानिमित्त शेवगा आणि  स्थानिक पदार्थापासून पौष्टिक पाककृती तयार करण्याच्या स्पर्धेचे आणि प्रात्यक्षिकाचे आयोजन यावेळी करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना गट विकास अधिकारी वि.. मुरकुटे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

          प्रदर्शनात नागली धिरडे, शेवगा पराठा, शेवगा भजी, चवळीची भजी, कारले भजी, आळुवडी, कच्च्या केळीची भाजी, टीएचआर शेवई फ्रँकी, शेवगा डोसा, शेवगा मुटकुळे, मेथी पराठा शेवगा सूप, मेथीच्या मुळापासून तयार केलेले सूप आदी पदार्थ ठेवण्यात आले होते.
          कार्यक्रमाला पं..सदस्य भस्माताई,  बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल डिघुले, कृषी अधिकारी सुनील विटनोर, सरपंच रामदास गायकवाड, ग्रामसेवक प्रशांत कानडे, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
---    

No comments:

Post a Comment