Wednesday 5 September 2018

कौशल्य विकास कार्यशाळा


स्वावलंबनासाठी कौशल्य विकास कार्यशाळा उपयुक्त-तुकाराम मुंडे


नाशिक दि.5- तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
नाशिक स्मार्ट सिटी, नाशिक महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने रोजगारक्षम मोफत कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी आयोजित दोन दिवसीय  कौशल्य विकास कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी  स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता  विभागाचे उपसंचालक सुनिल सैदाणे, सहाय्यक संचालक संपत चाटे आदी  उपस्थित होते.
श्री.मुंढे म्हणाले, स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्हांला स्वत:ची प्रगती करण्याची संधी मिळणार आहे. आपण कोणत्या क्षेत्रात प्रगती करु शकतो याचे ज्ञानदेखील या  माध्यमातून मिळू शकेल.  कार्यशाळेच्या माध्यमातून शहरातील जास्तीत जास्त तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे.  विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून याचा लाभ घेऊन युवकांनी आपली प्रगती साधावी,  असे श्री.मुंढे यांनी यावेळी सांगितले.
श्री.चाटे यांनी प्रास्ताविकात 158 विद्यार्थ्यांनी कार्यशाळेसाठी नोंदणी केल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
**********

No comments:

Post a Comment