Wednesday 15 November 2017

ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार

                                    स्वच्छतेची लोकचळवळ व्हावी-गिरीष महाजन

नाशिक दि.15- ग्रामस्वच्छतेसाठी नागरिकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणणे महत्वाचे असून स्वच्छतेची लोकचळवळ होण्यासाठी लोप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

 पाणी व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन आणि पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा व जिल्हा पंचायत संमेलन प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महापौर रंजनताई भानसी, आमदार बाळासाहेब सानप, अनिल कदम, जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांचे सभापती सुनीता चारोस्कर, मनीषा पवार, यतीन पाटील, जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले, चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. सर्वांगिण विकासाच्या दृष्टीनेदेखील स्वच्छतेचे महत्व आहे. जगातील महाशक्ती बनण्याचे प्रयत्न करताना अस्वच्छता देशाला मागे नेणारी ठरू शकेल. प्रगत राष्ट्रात त्यामुळेच स्वच्छतेला अत्याधिक महत्व देण्यात येते. हे लक्षात घेता राष्ट्रीय कार्य म्हणून अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे ‘स्वच्छ भारत’ अभियानाला वेग देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री म्हणाले, शासन शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. केवळ शासनस्तरावर प्रयत्न करून स्वच्छतेचे उद्दीष्ट गाठता येणे अशक्य आहे. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केल्यास मार्च 2018 अखेर स्वच्छतेचे उद्दीष्ट गाठता येईल. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान केवळ हागणदारीमुक्ती पुरते मर्यादीत नसून सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वचछता आणि वैयक्तिक स्वच्छतेलादेखील तेवढेच महत्व आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे स्वच्छतेच्या प्रयत्नांना गती मिळाली असून राज्यात माजी मंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी यादिशेने केलेले कार्यही मोलाचे होते, असे श्री.महाजन म्हणाले.

यावेळी बोलतांना आमदार कदम म्हणाले, स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छतेसंदर्भात ग्रामीण भागात अधिक सजगता आली आहे. स्वच्छता ही अविरत प्रक्रिया आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार लोकप्रतिनिधी स्वत:पासून स्वच्छतेस सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छ भारत अभियानामुळे नागरिकांत बदल घडून येत असून त्यामुळेच जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे, असेही ते म्हणाले.

          निफाड तालुका हागणदारीमुक्त करण्याबाबत अनुभव कथन करताना निफाड पंचायत समितीचे सभापती पंडीत आहेर यांनी लोकसहभाग आणि सर्वांच्या सहकार्यातून तालुका हगणदारीमुक्त झाल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात श्रीमती संगमनेरे यांनी जिल्ह्यातील 1017 ग्रामपंचायती आणि 6 तालुके हागणदारीमुक्त झाल्याची माहिती दिली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवकांनी  चांगली कामगिरी केल्याने जिल्ह्याने स्वच्छ भारत अभियानात चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. श्री.पाटील यांनी पंचायत संमेलनामागची संकल्पना स्पष्ट केली. नवभरताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश गावागावात पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

          पालकमंत्री महोदयांच्या हस्ते विजेत्या ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सिन्नर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. तर दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायत द्वितीय आणि नाशिक तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीस तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

          यावेळी पेठ तालुका हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला. पालकमंत्र्याच्या हस्ते तालुक्याचा सन्मान करण्यात आला. तसेच मंगळवारी हगणदारीमुक्त घोषित झालेला त्र्यंबकेश्वर तालुका आणि यापूर्वी हगणदारीमुक्त झालेल्या देवळा, कळवण, नाशिक आणि निफाड तालुक्यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

          विशेष पुरस्कारांतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार चांदवड तालुक्यातील शिरसाणे ग्रामपंचायतीला, पाणी व्यवस्थापनासाठी स्व. वसंतराव नाईक पुरस्कार कळवण तालुक्यातील  पाळे बु. आणि कुटुंब कल्याणासाठी आबासाहेब खेडकर पुरस्कार देवळा तालुक्यातील कणकापूर ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला.
          प्रारंभी नवभारत निर्मितीची शपथ घेण्यात आली.
          तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती- सन 2016-17

.क्र.
तालुका
ग्रामपंचायत
बक्षिस क्रमांक
1
इगतपुरी
उभाडे
प्रथम
2
इगतपुरी
बोरटेंभे
व्दितीय
3
इगतपुरी
पिंपळगाव डुकरा
तृतीय
4
सिन्नर
माळेगाव
प्रथम
5
सिन्नर
विंचुरदळवी
व्दितीय
6
सिन्नर
भाटगांव
तृतीय
7
निफाड
आहेरगांव
प्रथम
8
निफाड
विष्णुनगर
व्दितीय
9
निफाड
शिवरे
तृतीय
10
देवळा
कणकापूर
प्रथम
11
देवळा
सावको लो.
व्दितीय
12
देवळा
भऊर
तृतीय
13
बागलाण
दहिंदुले
प्रथम
14
बागलाण
रातीर
व्दितीय
15
बागलाण
जोरण
तृतीय
16
मालेगाव
सातमाने
प्रथम
17
मालेगाव
निमगांव खु.
व्दितीय
18
मालेगाव
मांजरे
तृतीय
19
दिंडोरी
अवनखेड
प्रथम
20
दिंडोरी
लखमापूर
व्दितीय
21
दिंडोरी
जऊळके वणी
तृतीय
22
कळवण
पाळे बु.
प्रथम
23
कळवण
आठंबे
व्दितीय
24
कळवण
मानुर
तृतीय
25
सुरगाणा
धोडांबे
प्रथम
26
सुरगाणा
प्रतापगड
व्दितीय
27
सुरगाणा
रगतविहिर
तृतीय
28
नाशिक
दरी
प्रथम
29
नाशिक
ओढा
व्दितीय
30
नाशिक
वाडगांव
तृतीय
31
त्र्यंबकेश्वर
कोटंबी हरसुल
प्रथम
32
त्र्यंबकेश्वर
अंबई
व्दितीय
33
त्र्यंबकेश्वर
हिर्डी
तृतीय
34
पेठ
आडगांव भुवनु  
प्रथम
35
पेठ
बोरवट
व्दितीय
36
पेठ
हनुमंतपाडा
तृतीय
37
चांदवड
शिरसाणे
प्रथम
38
चांदवड
हिरापूर
व्दितीय
39
चांदवड
डोंगरगाव
तृतीय


40
नांदगाव
गंगाधरी
प्रथम
41
नांदगाव
बोराळे
व्दितीय
42
नांदगाव
दहेगाव
तृतीय
43
येवला
एरंडगाव
प्रथम
44
येवला
बल्हेगाव
व्दितीय
45
येवला
नांदुर
तृतीय

No comments:

Post a Comment