Wednesday 15 November 2017

मधुमेह दिन

जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन


नाशिक दि.15- जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मधुमेह आजाराबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे,अति.जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.जी.एम.होले, डॉ.अनंत पवार, डॉ.गणेश चेवले, डॉ.जी.के.बनसोडे, जिल्हा असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय बर्वे, अधिसेविका मानीनी देशमुख आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.जगदाळे म्हणाले, राज्याच्या सार्वजनिक आरोग्यविभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मधुमेह सप्ताह राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 30 वर्षावरील 6 लाख नागरिकांची मोफत रक्त व रक्तदाब तपासणी  जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत करण्यात येणार आहे. तपासणीत मधुमेह अथवा उच्च रक्तदाब आढळल्यास मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. मधुमेह टाळण्यासाठी नैसर्गिक आहार, पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांचा आहारात नियमित समोवश करावा, असे आवाहन  त्यांनी केले.
 सप्ताहांतर्गत शासकीय रुग्णालयांसह रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. मधुमेह, कर्करोग आणि रक्तदाब याविषयावर स्पर्धांचे आयोजनदेखील करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

----

No comments:

Post a Comment