Tuesday 7 November 2017

आधारभूत दराने खरेदी

मुग, उडीद व सोयाबीनची आधारभूत दराने खरेदीस सुरुवात

       नाशिक, दि.7- केंद्र शासनाच्यावतीने बाजार समिती स्तरावर व खरेदी केंद्रावर मुग, उडीद व सोयाबीन यांची खरेदी सुरुवात करण्यात आली आहे. ही खरेदी पणन महासंघाकडून करण्यात येत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावर जावून ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर शेतमाल खरेदीचा दिनांक व वेळ एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना कळविण्यात येणार असून त्यामुळे त्यांना खरेदी केंद्रावर प्रतिक्षा करावी लागणार नाही. शेतमालाच्या खरेदीनंतर मालाची रक्कम शासनाच्यावतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका आठवड्याच्या आत थेट जमा केली जाईल.
          शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी खरेदी केंद्रावर सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकाच्या पानाची झेरॅाक्स सोबत घेऊन जावे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे एफएक्यू प्रतीचा शेतमाल विक्रीसाठी आणणे गरजेचे आहे. यासाठी चाळणी करुन पूर्णपणे वाळवलेला ज्यामध्ये कमाल आद्रता 12 टक्के आहे असा माल खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी केले आहे.

---

No comments:

Post a Comment