Wednesday 15 August 2018

रक्तदान शिबीर


रक्तदानासोबत अवयवदानासाठी पुढे यावे-गिरीष महाजन

नाशिक, दि. 15 :- रक्तदान सर्व दानात श्रेष्ठदान आहे. वर्षातून एकदा प्रत्येकाने रक्तदान करण्यासोबत अवयव दानासाठीदेखील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकिय शिक्षण,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. यावेळी  विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, डॉ.स्मिता ताजणे आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, रक्तदान  यज्ञ असून समर्पणाच्या भावनातून नागरिक या शिबिरात सहभागी होत असतात. रक्तदान करतांना नागरिक धर्म, जातीभेद विसरुन पुढे येत असतात. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत आयोजित केलेला हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
  मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक जण हे विविध अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणून अवयव दान करण्याबाबत बरीच जनजागृती केली जात असून समाजातील प्रत्येक नागरिकांनी अवयव दानासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी  यावेळी केले.   
00000

No comments:

Post a Comment