Tuesday 21 August 2018

केरळ मदतकार्य


पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधून केरळसाठी मदत रवाना

       नाशिक दि. 21:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली केरळ येथे गेलेल्या वैद्यकीय पथकाने मदतकार्यास सुरूवात केली असून आज नाशिक येथून औषधे आणि जीवनावश्यक वस्तुंनी भरलेला ट्रक कोचीकडे रवाना झाला.

पालकमंत्री महाजन हे स्वत: अर्नामुला,  वेलन्ना, एर्माक्कडू येथे झालेल्या मदतकार्यात सहभागी झाले होते.  येथे नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधे उपलब्ध करून देण्याबरोबरच भोजन वाटपदेखील करण्यात आले.

नाशिक येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयातून केरळ पुरग्रस्तांसाठी मदत एकत्रित करण्यात येत आहे. पालकमंत्री महाजन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार डॉ.राहूल आहेर यांनी वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातर्फे 5 टन साखर, राईस मील असोसिएशन घोटीतर्फे 4 टन तांदूळ, नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि जिल्हा रुग्णालयातर्फे एक लाख रुग्णांना पुरेल इतका आपत्कालीन वैद्यकीय औषधांचा ट्रकमध्ये रवाना करण्यात आला. हे  मदत साहित्य उद्यापर्यंत कोच्ची येथील मदत केंद्रात पोहोचणार असून तेथून त्याचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांनी दिली.
----

No comments:

Post a Comment