Friday 3 August 2018

टंचाई आढावा

टंचाई परिस्थसाठीच्या उपाययोजनांबाबत नियोजन करा-दादाजी भुसे  




मालेगाव, दि.  3 -   पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पाणीसाठा कमी झाला असून विविध विभागांनी संभाव्य टंचाई परिस्थितीसाठी करावयाच्या उपययोजनांबाबत आवश्यक नियोजन तयार ठेवावे,  असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
 शासकीय विश्रामगृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसिलदार ज्योती देवरे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, गट विकास अधिकारी आनंद पिंगळे व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री.भुसे म्हणाले,  पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही यादृष्टीने अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. पाणी टंचाई संदर्भात संबंधित गावाना 8 ते 10 दिवस अगोदर सुचना करावी.  चारा उपलब्धतेसाठी उपाय योजना करावी. दरमहा लागणाऱ्या चाऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन प्रस्ताव सादर करावेत.
कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिकेले प्रयत्न करावे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे श्री.भुसे म्हणाले.  
यावेळी महसूल, कृषी, वन, पाणी पुरवठा,विद्युत आदी विभागांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  
                                                   *************

No comments:

Post a Comment