Wednesday 15 August 2018

ऑर्गन टेम्पल बैठक


 ऑर्गन टेम्पलसाठी तातडीने जागा निश्चित करावी-गिरीष महाजन

          नाशिक, दि. 15-अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिक येथे उभारण्यात येणाऱ्याऑर्गन टेम्पलसाठी तातडीने जागा निश्चित करावी आणि जागतिक स्तरावरील वास्तू होईल असा आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश द्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावळी मेरी येथील वसतीगृह, त्र्यंबकेश्वर येथील रोपवेबाबतदेखील आढावा घेण्यात आला. बैठकीला विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., सा.बां. विभागाचे सहसचिव पी.के. इंगोले, मुख्य अभियंता एच.एस.पगारे, अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, मेरीचे महासंचालक आर.आर.पवार, मुख्य अभियंता जे.आर. जोशी, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले, देशभरातील पर्यटकांना आणि अवयवदान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक ठरेल असे ऑर्गन टेम्पल उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. पंचवटी परिसरात जागेची पाहणी करून जागा उपलब्ध असल्यास प्रस्ताव तातडीने सादर करावा. प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रीया तातडीने करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
          डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत वसतीगृह इमारतीबाबत आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, मेरी येथील इमारत तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येत असून योजनेअंतर्गत कायमस्वरुपी वसतीगृह बांधकाम करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे. मराठा समाजाच्या मुला-मुलींची निवड प्रक्रीया सुरू करावी. 31 ऑगस्टपर्यंत मेरी येथील इमारतींचे हस्तांतरण करण्यात यावे. त्याच परिसरात 200 विद्यार्थी आणि 100 विद्यार्थींनींची सुविधा करण्यासाठी आणखी इमारतीसाठी प्रस्ताव सादर करावा.
          त्र्यंबकेश्वर येथे रोप-वे  उभारण्याबाबत प्रक्रीया तातडीने करण्याचे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी दिले. सा.बां.विभाग, वन विभाग आणि महसूल विभागाने एकत्रित बैठक घेऊन समन्वयाने या प्रकल्पातील अडचणी दूर कराव्यात, असे त्यांनी सांगितले. 
-----

No comments:

Post a Comment