Friday 24 August 2018

अस्थी विसर्जन


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थीचे विसर्जन

          नाशिक, 24 : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीष महाजन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत  रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले.

यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, स्वामी सोमश्वरनन्द सरस्वतीजी आदी उपस्थित होते.
एनडी पटेल रोडवरील वसंतस्मृती येथून 11 वाजता अस्थी कलश यात्रेला प्रारंभ झाला. कलशयात्रा अण्णाभाऊ साठे चौक, आंबेडकर चौक, शिवाजी रोड, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मालवीय चौकमार्गे रामकुंड येथे पोहोचली. याठिकाणी गोदावरी पात्रात अस्थिंचे विसर्जन करण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment