Thursday 7 December 2017

सभागृह उद्घाटन

सहकारच्या माध्यमातून राज्य समृद्ध करा-सुभाष देशमुख

नाशिक दि. 7 -  परिसरातील गरजा आणि उत्पादनांचा अभ्यास करीत सहकारी संस्थांनी स्थानिक स्तरावरच रोजगार निर्मिती करुन सहकाराच्या माध्यमातून राज्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
कळवण येथे शेतकरी सहकारी संघाच्या सहकार महर्षि स्व.डॉ.दौलतराव आहेर व्यापारी संकुल आणि सहकार महर्षि कै.भिला दाजी पवार सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला  खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ.राहुल आहेर, प्रवीण दरेकर, जे.टी.गावीत, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केदा आहेर, नगराध्यक्षा सुनिता पगार, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार आदी उपस्थित होते.  

श्री. देशमुख म्हणाले, राज्यातील विविध कार्यकारी संस्थांच्या संचालकांना प्रशिक्षण देवून गावातच व्यवसाय सुरु व्हावेत यादृष्टीने शासनाने ‘अटल पणन विकास महायोजना’ सुरु केला आहे. योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न आहेत. गावातील गरजा उत्पादन आणि शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून या संस्थांनी व्यवसाय सुरु करणे अपेक्षित आहे अशा पद्धतीने 25 हजार युवकांना रोजगार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारी संस्था अनेकांच्या त्यागातून उभ्या राहतात त्या चांगल्यारितीने चालविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत आणि कळवण येथील शेतकरी संघ हा राज्यात आदर्श ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्ती केली.     ----

No comments:

Post a Comment