Saturday 16 December 2017

पीककर्जाच्या ओझ्यातून सूटका

                     बाजीराव दाते यांची पीककर्जाच्या ओझ्यातून सूटका

नाशिक दि.16- नाशिक तालुक्यात तळेगाव (अं) येथील बाजीराव दाते शेतकऱ्याचे साठ हजार रुपयाचे कर्ज कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ झाल्याने मोठ्या ओझ्यातून सुटका झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
 दाते यांनी 2013 मध्ये शेतीसाठी कर्ज घेतले. कुटुंबाच्या आठ सदस्यांची जबाबदारी असल्याने शेतीवरच्या उत्पन्नातून कुटुंब चालवताना ओढाताण व्हायची. त्यांनी शेतीसाठी 2013 मध्ये तळेगाव सोसायटीतून 43 हजाराचे कर्ज घेतले. 2017 पर्यत व्याजासह वाढत कर्ज 60 हजार रूपये झाले. 2013 ते 2017 दरम्यान नैसर्गिक संकटांमुळे शेती उत्पन्नावर परिणाम झाला. याच काळात उद्भवलेले पत्नीचे आजारपण, तीन मुलांचे शिक्षण या आर्थिक अडचणींतून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या  मुलाचे शिक्षणदेखील थांबले. कुटुंबासाठी हातभार लावण्यासाठी त्याच्यासाठी नोकरीचा शोध सुरु झाला.

अशा परिस्थितीत कर्ज अदा करणे त्यांनी शक्य नव्हते. त्यामुळे शेतीसाठी नवे कर्ज मिळण्यातही अडचणी होत्या. शासनाने कर्जमाफी दिल्याने डोक्यावरचा मोठा भार हलका झाल्याने कुटुंब आंनदीत झाले आहे. कर्जमाफीमुळे मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.

तळेगाव (अंजनेरी) आदीवासी विकास सोसायटीने जिल्हा बँकेमार्फत प्राप्त निधीतून आपल्या शेतकरी सभासदांना कर्जमाफीचे 3,24,733 रुपये व प्रोत्साहन लाभाचे 7,33,668 रुपये असे एकूण 10 लाख 58 हजार 301 रक्कमांचे लाभ दिले आहेत.


अल्पभूधारक शेतकरी सोमनाथ देवराम डेमसे  आणि वाळू केरु दाते यांनी कर्ज नियमित फेडल्याने त्यांना प्रत्येकी प्रोत्साहनपर लाभ 15 हजार रुपये देण्यात आले आहे. वामन दाते यांना 13 हजार 645 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे. कर्जमाफीतील रक्कमा मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंद निर्माण झाला आहे.


No comments:

Post a Comment