Tuesday 12 December 2017

ध्वजदिन निधी

ध्वजदिन निधीत सामाजिक जाणीवेतून योगदान द्या-रामदास खेडकर


नाशिक दि.22-सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून ध्वजदिन निधीत नागरिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित ध्वजदिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) प्रांजळ जाधव, तहसीलदार सी.एस.देशमुख आदी उपस्थित होते.

श्री.खेडकर म्हणाले, सैनिक कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता देशाच्या संरक्षणात व्यस्त असतात. त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनीदेखील माजी सैनिकांच्या समस्यांकडे संवेदनशिलतेने पहावे व त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.चौधरी यांनी देशाच्या संरक्षणात आणि एकूण विकासात सैनिकांची महत्वाची भूमीका  असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ध्वजदिन निधी संकलनात चांगली कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचादेखील सत्कार करण्यात आला. यावेळी हेरंब सहस्त्रबुद्धे यांनी  दहा हजार रुपयांचा धनादेश ध्वजदिन निधीस धनादेशरुपाने दिला. श्री.सहस्त्रबुद्धे देशभक्तीपर कार्यक्रमात हा निधी संकलीत करीत आहेत.

---

No comments:

Post a Comment