Saturday 23 December 2017

नाशिक विमानसेवा शुभारंभ

पालकमंत्र्यांच्या हस्ते नाशिक विमानसेवेचा शुभारंभ

नाशिक दि.23 :-  राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते नाशिकहून पुणे तसेच मुंबईसाठी विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईहून एअर डेक्कनच्या पहिल्या  विमानाने पालकमंत्र्यांसह चौदा प्रवाशांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनातर्फे आलेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.

पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तसेच प्रवाशांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते पुण्याला जाणऱ्या प्रवाशांना बोर्डींग पास देण्यात आला. एकूण 13 प्रवासी विमानाने पुण्याला गेले.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार  बाळासाहेब सानप, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, महापौर रंजना भानसी, विमान उड्डयन मंत्रालयाचे सचिव आर.एन. चौबे, एअर डेक्कनचे  प्रमुख कॅप्टन गोपीनाथ, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना,  पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.
          उद्योग, पर्यटन, व्यापार, सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

विमानसेवेमुळे नाशिकच्या विकासाला चालना

          नाशिहून ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेमुळे नाशिकच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री महाजन यांनी विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी केले.
          ते म्हणाले, विमानसेवेमुळे नशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे प्रवास वेगवान होणार आहे. काही मिनिटात मुंबईला पोहोचणे शक्य असल्याने उद्योजकांना ही सुविधा नाशिककडे आकर्षित करणारी ठरेल. नाशिकच्या व्यापार क्षेत्रालाही याचा लाभ होईल. ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली विमानसेवा नाशिकच्या विकासाच्यादृष्टीने महत्वाचे पाऊल असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी सेवा सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

---         

         

No comments:

Post a Comment