Monday 17 October 2016

मतदार नोंदणीचे आवाहन

पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीचे आवाहन
नाशिक दि.17-नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाने घोषित केला असून पदवीधर नागरिकांनी 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
1 नोव्हेंबर 2013 पूर्वी पदवीधर असलेली व्यक्ती  पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पात्र आहे.  पात्र व्यक्तींनी शासकीय सुट्टीचा दिवस सोडून इतर दिवशी तहसील किंवा मंडळ अधिकारी कार्यालयात अर्ज जमा करावेत. नोंदणी करतेवेळी फॉर्म नमुना 18 परिपूर्ण भरून द्यावा. अपूर्ण अर्ज स्विकारले जाणार नाहीत.  एक गठ्ठा अर्जदेखील स्विकारले जाणार नाहीत.
अर्जासोबत 31 ऑक्टोबर पूर्वीचा पदवीधरबाबतचा पुरावा  रहिवासी पुरावा(वीज बिल, टेलिफोन बिल, मनपा/नपा कडील  घरपट्टी बिलाची झेरॉक्स, ग्रामपंचायतीकडील कर पावती तसेच ज्या कागदपत्रावर ठळकपणे रहिवास दिसेल असा दस्तऐवज यांपैकी कोणतेही एक), पदवीधर मतदाराचे अलिकडील काळाचे छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.
पदवीधर मतदाराचे ज्या विधानसभा मतदारसंघातील यादीत नाव आहे त्या यादीचा भाग क्रमांक किंवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक व मतदार छायाचित्र ओळखपत्राचा क्रमांक फॉर्मवर भरणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने तसेच यु.जी.सी. ग्रँड कमिशनने घोषित केलेल्या पदवी/पदविका मतदार नोंदणीसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
पदवीधर मतदार नोंदणी फॉर्मबाबत काही अडचणी असल्यास संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी/नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील मतदार केंद्र येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी नाशिक पदवीधर मतदारसंघ नाशिक यांनी केले आहे.
0000000000


No comments:

Post a Comment