Monday 17 October 2016

मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम

मतदार  याद्या पुनरिक्षण कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन
नाशिक, दि. 17 :भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावार आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यकम 16 सप्टेंबर 2016 ते  5 जानेवारी 2017 या कालावधीत राबविण्यात येत असून दावे व हरकती स्विकारण्याची अंतिम मुदत 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण  होत असलेल्या नागरिकांनी सदर कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी केले आहे.

-----

No comments:

Post a Comment