Tuesday 10 July 2018

बोंडअळी व्यवस्थापन


कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत आवाहन
नाशिक, 10 : खरीप हंगामात कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणाच्यादृष्टिने जुलै व ऑगस्ट महिना महत्वाचा असल्याने कृषी विभागाच्यावतीने कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्यावतीने पिकावरील  कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकर पेरणी केलेल्या कापूस पिकाला  पाते लागण्याच्या वेळेस प्रतिबंधक उपाय योजना म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी कृष विभागाचे तसेच कृष विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घ्यावे.  
पूर्व हंगामी तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या विशेषत: खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कापूस पिकांवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने  अशा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कृष उद्योग विकास महामंडळाकडून तालुका पातळीवर तातडीने सर्वेक्षण व मास ट्रॅपिंगसाठी फेरोमेन सापळे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचा वापर करुन बोंडअळी नियंत्रणाबाबतच्या उपाययोजना हाती घेण्यात याव्यात.   
जिनींग मिलमध्ये फेरोमेन सापळे तसेच प्रकाश सापळे यामध्ये शेंदरी बोंडअळीचे पतंग आढळून येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळी नियंत्रणाच्या उपाय योजना तात्काळ कराव्यात. एम-किसानच्या माध्यमातून कृषि विभागाने दिलेल्या संदेशाप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी कृषि विभागाबरोबरच शेतकरी, कृषि विज्ञान केंद्र, शासकीय तसेच खाजगी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी, निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांनी पुढाकार घेऊन मोहिम स्वरुपात काम करावे, असे आवाहन कृष आयुक्तांनी केले आहे.
----


No comments:

Post a Comment