Tuesday 10 July 2018

रासायनिक खताबाबत आवाहन


रासायनिक खते खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन
       नाशिक, 10 : राज्यात शेतकऱ्यांनी खरिप हंगामात पीक लागवडीस सुरुवात झाली असून  भेसळ असलेल्या खतांची खरेदी न करता अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रातून तसेच केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत ग्रेडच्या खत खरेदीस प्राधान्य देण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
 राज्यात कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित असून  1131 निरक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे.         राज्यात काही ठिकाणी खत नियंत्रण आदेशातील समाविष्ठ ऑर्गेनिक डी.ए.पी किंवा नॅचरल पोटॅश अशा बनावट खताच्या बॅगवर चुकीचा मजकूर छापून विक्री करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फसवणूटाळण्यासाठी विनापरवाना विक्री होत असलेल्या ठिकाणाहू  तसेच अनधिकृत विक्रेते यांच्याकडून खत खरेदी करु नये. बॅगवरील मजकूर योग्य असल्याची खात्री करुन खत खरेदी करावे.
          दिशाभुल करुन खतांची विक्री होत असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने खत विक्री ही खत नियंत्रण आदेश 1985 या कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे. तसे आढळून आल्यास जवळ असलेल्या पंचायत समिती, कृषि विभाग व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कृष विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment