Wednesday 11 July 2018

स्पर्धापरीक्षा पूर्व प्रशिक्षण


आदिवासी उमेदवारांकरिता स्पर्धापरीक्षा पूर्व प्रशिक्षण

 नाशिक दि.11 :-  राज्यातील आदिवासी उमेदवारांना शिपाई, लिपिक, ग्रामसेवक, तलाठी अशा वर्ग-3, वर्ग-4 तसेच इतर पदांकरिता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेबाबत माहिती देऊन पूर्वतयारी करुन घेण्याकरीता कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता माहिती मार्गदर्शन केंद्र कळवण येथे  1 ऑगस्ट 2018 पासून साडे तीन महिने कालावधीचे स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. एक हजार विद्यावेतन दिले जाणार आहे. अनु.जमाती प्रवर्गातील 18 ते 38 वर्ष वयोगटातील व किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र 27 जुलै 2018 रोजी सकाळी 9.30 वा. जुने तहसिल कार्यालय आवार नेहरु चौक, कळवण जि. नाशिक येथे मुलाखतीस उपस्थित रहावे. सोबत जात प्रमाणपत्र व स्वत:च्या नावे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँक खाते पुस्तकाची सत्यप्रत आणावी.
मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. तसेच प्रवास खर्च दिला जाणार नाही. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी अर्ज करु नयेत. अधिक माहितीसाठी 02592-222973 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे  कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी  शं.बा.जाधव यांनी कळविले आहे.                                                          -----

No comments:

Post a Comment