Sunday 1 July 2018

13 कोटी वृक्ष


धोंडेगाव येथे जिल्हास्तरीय वृक्ष लागवडीचा शुभारंभ

नाशिक दि.1: राज्य शासनातर्फे 1 ते 31 जुलै दरम्यान आयोजित 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते धोंडेगाव येथील काश्यपी धरणासमोरील डोंगरावर करण्यात आला.

यावेळी आमदार योगेश घोलप, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी, विशेष पोलीस महानिरीक्षक चेरिंग दोरजे, मुख्य वन संरक्षक एस. व्ही. रामाराव, पश्चिम भाग उपवनसंरक्षक डॉ. टी.ब्युला एलील मती, सहाय्यक वनसंरक्षक एस व्ही घुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, सँमसोनाईटचे संचालक यशवंत सिंग, सरपंच इंदुबाई बेंडकोळी आदी उपस्थित होते.

धोंडेगाव व देवरगांव येथे 45 हेक्टर क्षेत्रात 49  हजार 500 रोपे लावण्यात करण्यात येणार आहेत. यात  निम, सिसू, शिरस, बाभुळ, शिसम, खैर, आवळा, शिवम, करंज, साग, अंजन, वावळा, आपटा, खाया, आंबा, चिंच, जांभुळ, सिताफळ, वड, पिंपळ, उंबर, बेंहडा, हिरडा, रिठा, अर्जुन सादडा, कवठ, अमलतास आदी वृक्ष प्रजातींचा समावेश आहे.

उपक्रमात लहान बालकांसमवेत पालक, ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले. काही ठिकाणी आजी-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्यांनी एकत्र येवून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. जिल्हाधिकारी यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण करुन त्यांचा उत्साह वाढविला. सामाजिक संस्था आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. यात के.के. वाघ इंजिनिअर कॉलेज, ग्रामविकास मंच गिरणारे गाव, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, स्पंदन संस्था, धोंडेगाव आश्रम शाळाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेत  वृक्षारोपण केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय आयुक्त राजाराम माने यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, पल्लवी निर्मळ, दिपमाला चौरे, श्रीनिवास अर्जुन, स्वाती थविल, वासंती माळी व कर्मचारी उपस्थित होते.

************

No comments:

Post a Comment