Saturday 7 July 2018

फळपीक विमा योजना


विभागातील 37 तालुक्यात फळपीक विमा योजना
नाशिक, 7 : प्रतिकूल हवामान घटकापासून विमा संरक्षण देण्यासाठी नाशिक विभागात 37 तालुक्यांतील 180 महसुल मंडळात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.
  विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व अधिसूचीत फळ पीकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक आहे.
डाळींब पिकासाठी फळधारणेच्या अवस्थेत कमी पावसासाठी विमा संरक्षण कालावधी 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2018, फळवाढीच्या अवस्थेत कमी पावसासाठी 16 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर आणि काढणी अवस्थेत जास्त पावसासाठी 16 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2018 असून विमा भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2018 आहे. डाळींब पिकासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर एक लाख 21 हजार 100 असून शेतकऱ्यांनी 6 हजार 50 रुपये विमा हप्ता भरावयाचा आहे. इच्छूक फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी तसेच कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी सहसंचालक नाशिक विभाग यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment